
जिल्ह्यात कल्पवृक्ष योजना सुरु करावी : आ. भाई जगताप यांची शासनाकडे मागणी
रत्नागिरी जिल्ह्यातील खाडीकिनारी वसलेल्या गावांना, ग्रामपंचायतींना गावच्या क्षेत्रफळामध्ये खाडीकिनारी नारळ लागवडीसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा, यासाठी कल्पवृक्ष योजना राबवावी, अशी मागणी आमदार भाई जगताप यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, खारभूमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व मत्स्य व्यवसाय, बंदरविकास मंत्री नितेश राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गुहागर कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद चाचे यांनी याबाबत आ. जगताप यांना पत्रव्यवहार करुन मागणी केली होती. या पत्राला अनुसरुन आ. जगतापयांनी सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोकणाला विशाल समुद्रकिनारा लाभला असून रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचे क्षेत्र हे खाडीकिनारी आहे. खाडीकिनारी असलेल्या जागा या शासनाच्या ताब्यात असल्यामुळे हा भाग शासन मालकीचा आहे. बंदर विभाग, खार जमीन विभाग यांनी अशा ग्रामपंचायतींना खाडीकिनारी नारळ लागवडीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, तसेच खाडीकिनारी असलेल्या गावांना तेथील ग्रामपंचायतीना नारळ लागवडीसाठी प्रोत्साहन द्यावे, असे म्हटले आहे.www.konkantoday.com




