
जयगड तिहेरी हत्याकांड प्रकरणी आणखी एका पोलिसाचे निलंबन होणार?
रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या जयगड येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्याला निलंबित केल्यानंतर आणखी एक पोलीस कर्मचार्यावरही निलंबनाची टांगती तलवार कायम आहे. संबंधित पोलीस कर्मचार्याची वाहतूक शाखेत बदली झाल्यामुळे त्या खात्याला त्याला निलंबित करण्याबाबत जिव्हा पोलीस दलाने प्रस्ताव दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यौधी दिली आहे.जयगड पोलीस स्थानकात दाखल झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणापूर्वी बेपत्ता प्रकरणांचा तपास झाला नाही, हलगर्जीपणा केल्यामुळे ही कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले आहे. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यातील एका अधिकार्यासह दोन पोलीस कर्मचारी अडचणीत आले. परिसरातील बेपत्तांच्या तक्रार अर्जाकडे दुर्लक्ष केल्या प्रकरणी पोलीस खात्याकडून जयगड पोलीस ठाण्याच्या तपास यंत्रणेवर बोट ठेवण्यात आले. या तपासातील चौकशी अंती नुकतेच एका पोलीस हवालदाराला निलंबित केले आहे.तिहेरी हत्याकांडातील मृत राकेश जंगम बेपत्ता प्रकरणात जयगड पोलिसांनी दाखवलेल्या निष्काळजीपणावर जोरदार टीका झाली. यानंतर अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.www.konkantoday.com



