
चिपळूण मध्ये भाजप तर्फे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
राष्ट्रगौरव पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण देशभरात सेवा पंधरवडा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानानिमित्ताने व तसेच भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे.
सेवा पंधरवडा अभियानांतर्गत संपूर्ण देशभरात नशामुक्ती भारत अभियानाचा प्रचार व प्रसार होण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. त्याच अनुषंगाने आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने चिपळूण येथे जिल्हास्तरीय नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे आयोजन करीत आहोत. सदर स्पर्धा दोन गटात होणार असून प्रथम गट हा वय वर्ष १४ ते १८ वर्ष असेल तर दुसरा गट हा वय वर्ष १८ पासून पुढे खुला असेल. ही नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धा दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ६:३० वा. ते १०:३० वा. पर्यंत या वेळेत होणार आहे.
-सदर नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेचे अंतर ३ कि. मी. आणि ५ कि. मी अश्या दोन टप्प्यांमध्ये असणार आहे. या स्पर्धेच्या प्रथम टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ बाजारपूल येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल. तर दुसऱ्या टप्प्याचा मार्ग इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिंचनाका बाजारपेठ – बाजारपूल -गोवळकोट कमानी येथून पुन्हा त्याच मार्गे इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे समाप्त होईल.
नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये प्रथम तीन क्रमांक काढणाऱ्या स्पर्धकांना विजेते घोषित केले जाईल. प्रथम गट – प्रथम क्रमांक रोख रक्कम ५०००/- रु., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ४०००/- रु., मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रक्कम ३०००/- रु, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम २०००/- रु. व मेडल, पाचवा क्रमांक रोख रक्कम १०००/- रु. व मेडल, सहावा क्रमांक रोख रक्कम ५००/- रु. व मेडल, सातवा क्रमांक ३००/- रु. व मेडल, आठवा क्रमांक २००/- रु. व मेडल देऊन सन्मानित केले जाईल. तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना मेडल व आकर्षक टी शर्ट देऊन सन्मानित केले जाईल. ही स्पर्धा विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा दोन स्वतंत्र गटात होणार आहे.
खुल्या गटात महिला व पुरुष अश्या दोन गटात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. प्रथम क्रमांक रोख रक्कम १०,०००/- रु., मेडल व आकर्षक सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक रोख रक्कम ७५००/- रु., मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक रोख रक्कम ५०००/- रु, मेडेल व आकर्षक सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक रोख रक्कम २५००/- रु. व मेडल, पाचवा क्रमांक रोख रक्कम १०००/- रु. व मेडल देऊन सन्मानित केले जाईल. ही माहिती जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, सतीश मोरे, भाजप नेते प्रशांत यादव,विक्रम जैन, अमित केतकर, दत्ताराम नार्वेकर, अभय भाटकर, उदय घाग, मंदार खंडकर, प्रणाली सावर्डेकर, विनोद भुरण, शशिकांत मोदी आदी उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संघर्ष क्रीडा मंडळ, मंगेश तांबे, सचिन कदम, मुन्ना कदम, भाऊ कदम, मंदार कानपडे, रमण डांगे आदी सहकार्य करीत आहेत.
तरी या नमो युवा रन मॅरॅथॉन स्पर्धेमध्ये विद्यालयातील / महाविद्यालयातीलतसेच खुला गट मध्ये पुरुष महिला यांनी भाग घ्यावा. असे आवाहन आयोजक यांनी केले आहे.




