
खेड येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेच्या अटकेतील एका संचालकाची जामिनावर मुक्तता
खेड तालुक्यातील भरणे येथील शामराव नागरी सहकारी पतसंस्थेत झालेल्या ४ कोटी २२ लाख रूपयांच्या अपहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संचालक शशिकांत शिंदे यांची न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली. पतसंस्थेत झालेल्या अपहारप्रकरणी अध्यक्ष दत्ताराम बैकर, उपाध्यक्ष सुधाकर शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया योगेश सुतार, संचालक सुभाष भिकू शिंदे, शशिकांत नथुराम शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. संशयितांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. यातील शशिकांत शिंदे यांच्या वतीने ऍड. खोपकर यांनी जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता.
या जामीन अर्जावर सुनावणी झाली असता ऍड. खोपकर यांनी उच्च न्यायालयाचे दाखले देत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमातील कायदेशीर तरतुदींचा संदर्भ दिला.
www.konkantoday.com




