
उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सात अभियंत्यांना पुरस्कार
सार्वजनिक बांधकाम विभागातील उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी व कर्मचार्यांना २०२४-२५ या कालावधीसाठी राज्य सरकारने पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ७गुणवत्ता प्राप्त अधिकार्यांचा समावेश आहे. त्यात रत्नागिरीतील २ व सिंधुदुगतिील ५ जण आहेत. रत्नागिरी हे सर्वाधिक पुरस्कार मिळवणारे राज्यातील मंडळ ठरल आहे.
महेंद्र पांडुरंग किणी हे कार्यकारी अभियंता म्हणून मालवण येथे कार्यरत आहेत. अजित पाटील हे उपविभागीय अभियांत्रिकी सहाय्यक, सूरज गिरी है कनिष्ठ अभियंता हे. मालवण येथे कार्यरत अभियंता समाधान खैरनार हे स्थापत्य आहेत.
शुभम दुडये हे कनिष्ठ अभियंता म्हणून वैभववाडी येथे कार्यरत आहेत. अभिजित पाटील हे शाखा अभियंता म्हणून सार्वजिक बांधकाम मंडळ येथे कार्यरत आहेत. महेश वास्ते हे मंडणगड येथे उपविभागीय अभियंता म्हणून कार्यरत आहेत.
बीस जणांना पुरस्कार प्रती वर्षी सार्वजनिक बांधकाम खात्यातील उल्लेखनीय कार्य करणार्या कर्मचार्यांना पुरस्कार घोषित केले जातात. यावर्षी तांत्रिक स्वरुपाचे काम करणार्या २० अधिकारी व कर्मचार्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून मिलींद कुलकर्णी हे काम करत आहेत. पुरस्कार जाहीर झालेल्या अधिकार्यांचा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुंबईतील प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिर येथे हा कार्यक्रम होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने कळवले आहे.
www.konkantoday.com




