
आता दाखले मिळवायची पळापळ संपली, जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतींमध्ये महा ई सेवा केंद्र सुरू होणार
ग्रामविकास विभागाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतींमध्ये महा ई सेवा केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे दाखले, उतारे, परवानग्या, ना हरकत प्रमाणपत्र यांसारख्या विविध सेवा आता नागरिकांना गावातच मिळणार असून, यासाठी बाहेर जाण्याची गरज राहणार नाही.
अधिकृत सूत्रांनी सांगितले की, ग्रामपंचायतींच्या मालकीची ही केंद्रे असतील. कोणाही खासगी व्यक्तीला न देता ग्रामपंचायतीने हीं केंद्रे चालवावीत असे अपेक्षित आहे. जिल्ह्यातील ८१९ ग्रामपंचायतीमध्ये केंद्रे सुरू झाल्याने लोकांना दाखले, उतारे यासारख्या विविध प्रकारच्या सुविधांसाठी गावाबाहेर जावे लागणार नाही. काही बाबतीतील परवानगी, ना हरकत प्रमाणपत्र आदी दस्तऐवज नागरिकांना त्यांच्या परिसरातच उपलब्ध होतील.
याशिवाय जिल्ह्यात खासगी केंद्र चालकांसाठी डिसेंबरमध्ये एक जाहिरात देण्यात आली होती. त्यानुसार १४८ जागांकरीता अर्ज मागवण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाला ४९७ अर्ज प्राप्त झाले. यापैकी, १०६ जागांसाठी दाखले मान्यताप्राप्त यादी प्रसिद्ध झाली आहे. केंद्र मंजूर झालेल्या लोकांचे आयडी तयार करण्यासाठी मंत्रालय पातळीला शिफारस झाली आहे. २ महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होऊन खासगी महा ई येत्या सेवा केंद्र चालक आपापली केंद्रे पूर्ण क्षमतेने सुरू करू शकतील..
२१ ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तेथे केंद्रे कार्यरत होऊ शकत नाही. याशिवाय २१ जागांवर आलेले सर्वच्या सर्व अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण ४२ ठिकाणी केंद्र सुरू होऊ शकणार नाही. शाळांच्या पातळीला विद्यार्थ्यांची आधार जोडणी करण्याविषयी शालेय शिक्षण विभागाने आग्रही भूमिका घेतली आहे. अनेक शाळांमध्ये हे काम मार्गी लागले आहे. तथापि १०० टक्के स्वरुपात काम पूर्ण होण्यासाठी शाळा स्तरावर शिबिरे आयोजित करण्याचे शासनाचे निर्देश आहेत.www.konkantoday.com




