
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत रत्नागिरीत रक्तदान शिबिराचे आयोजन
रत्नागिरी :
सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत आज रत्नागिरी शहरामध्ये सिव्हिल हॉस्पिटल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व मा. प्रदेशाध्यक्ष श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब तसेच मा. संपर्क मंत्री, मत्स्योद्योग बंदर व विकास मंत्री श्री. नितेशजी राणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
या कार्यक्रमाचे विशेष मार्गदर्शन जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत व महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांनी केले, तर रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या नियोजनातून व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये महिला जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे, राजू भाटलेकर, संदीप सुर्वे, निलेश आखाडे, संतोष सावंत, अशोक वाडेकर, मनोज पाटणकर, राजन फाळके, रामदास शेलटकर, सत्यवती बोरकर, भक्ती दळी, सायली बेर्डे, प्रज्ञा टाकळे, प्रीती शिंदे, सारिका शर्मा, महिला शहराध्यक्ष पल्लवी पाटील, संपदा तळेकर, प्रसाद बाष्ट्ये, नितीन गांगण, अमित विलणकर, शैलेश बेर्डे, तुषार देसाई, नितीन जाधव, चंद्रकांत खेडेकर, विजय माळवदे, नरेंद्र कदम, पुंडलिक पावसकर, समीर सावंत, प्रशांत घाणेकर व संजीव बने आदी मान्यवरांचा समावेश होता.
शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारामुळे रक्तदान शिबिरात नागरिक व कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सामाजिक उपक्रमांबाबत दादा ढेकणे यांची सातत्यपूर्ण धडपड व नियोजन यामुळे शहरातील सेवा पंधरवड्यातील विविध उपक्रमांना वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिक व कार्यकर्त्यांकडून समाधान व्यक्त करण्यात आले असून, शहराध्यक्ष म्हणून दादा ढेकणे यांची कामगिरी प्रशंसनीय ठरली आहे.




