मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष ; लाभार्थ्यांसाठी हक्काचे पाठबळकागदपत्रं दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी 1 लाख जमा


रत्नागिरी, दि. 24 ) : मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये कागदपत्रे दिल्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी रुग्णालयाच्या खात्यामध्ये 1 लाख रुपयांची मदत जमा झाली. हा कक्ष म्हणजे रुग्णांसाठी, नातेवाईकांसाठी हक्काचे पाठबळ असल्याची प्रतिक्रिया रुग्णांनी त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील 40 रुग्णांना 30 लाख 55 हजार रुपयांची मदत झाली आहे. राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरविली जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात दि.22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी, याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या कक्षाचा लाभ घेतलेल्या रुग्णांनी, नातेवाईकांनी खालीलप्रमाणे प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कुलदीप खातू – माझे वडील प्रकाश खातू यांचा गुडघा रोपण करायचे होते. त्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी संपर्क साधला. मला योग्य माहिती मिळाली आणि तसा अर्ज केला. त्यानंतर खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा झाले. त्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खूप खूप मन:पूर्वक आभार मानतो.
ओंकार प्रमोद पाटील- माझा मेहूणा केतन प्रकाश नारकर याला मेंदुचा आजार झाल्यामुळे कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल केले होते. तिथला येणारा अंदाजे खर्च 7 लाख रुपये एवढा होता. त्याच्या घरची आर्थिक परिस्थिती गंभीर असल्यामुळे त्याला एवढा खर्च करणे शक्य होत नव्हतं. अडचणी येत होत्या. आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे संपर्क केला. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आम्हाला 50 हजार रुपये मंजूर झाले. त्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून आम्हाला सर्वांनी मदत केली. याबद्दल मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मी तात्काळ रक्कम उपलब्ध करुन दिल्या त्याबद्दल खूप खूप आभारी आहे.
अमोल एकनाथ महाडिक – माझी मुलगी आदिती अमोल महाडिक ही एक महिन्यापासून बाल रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली होती. तिला थोडी मेंदुची समस्या होती. त्यामुळे त्या आजारासाठी येणारा खर्च माझ्यासाठी खूप त्रासदायक होता. त्यामुळे मी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामध्ये अर्ज वगैरे भरुन त्यांची मदत घेतली. मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडून आम्हाला 50 हजार एवढी रक्कम मिळाली. त्याबद्दल आम्ही आभार मानतो.
मयुरी मनोहर तळेकर – माझे वडील दत्तात्रय शंकर पांचाळ यांच्या मेंदुची शस्त्रक्रीया झाली. मी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाकडे मदतीसाठी अर्ज केला. या कक्षाच्या माध्यमातून त्यांनी 1 लाख रुपयांची मदत केली. माझी परिस्थिती फार हालाखिची आहे.
पराग चंद्रकांत भाटकर – माझ्या भाचीला कोल्हापूर येथे उपचारासाठी केले होते. तिच्या मेंदुची शस्त्रक्रिया करावयाची होती. त्यासाठी साडे तीन लाख रुपये खर्च अपेक्षित होता. पैशांची कमतरता असल्याने पैसे जुळावाजुळव चालू होती. तेव्हा आम्हाला समजलं की मुख्यमंत्री सहाय्यता कक्षातून मेंदुवरील शस्त्रक्रियेसाठी पैसे मिळतात. म्हणून आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता कक्षात चौकशी केली. त्याठिकाणी अमित कोरगावकर होते, त्यांनी आम्हाला कोणते कागदपत्र पाहिजेत त्याची माहिती दिली. त्याप्रमाणे आम्ही त्यांना सर्व कागदपत्रे दिली. कागदपत्र दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी 1 लाख हॉस्पिटलच्या खात्यात जमा झाले.
रुग्ण त्यांचे नातेवाईक त्यांच्या प्रतिक्रिया म्हणजे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष हा सर्वसामान्य नागरिकांसाठी हक्काचे मदतीचे पाठबळ ठरत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button