
मनसे गुहागरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचा सत्कार
गुहागर तालुक्यातील जानवळे शाळा नं. १ मधील शिक्षक चंद्रकांत बेलेकर यांना रत्नागिरी जिल्हा परिषदच्या वतीने सन २०२४-२५ या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. यानिमित्त त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गुहागरचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली शृंगारतळी येथील मनसेच्या संपर्क कार्यालयात जिल्हा उपाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मनसे गुहागरच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त चंद्रकांत बेलेकर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी तालुका सचिव प्रशांत साटले, शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, उपतालुका अध्यक्ष अमित खांडेकर, जितेंद्र साळवी, विद्यार्थी सेना गुहागर तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, विभाग अध्यक्ष प्रसाद विखारे,कौढर काळसूर शाखा अध्यक्ष सुनील मुकनाक, मळण शाखा अध्यक्ष मंगेश धामणस्कर, तसेच असंख्य महाराष्ट्र सैनिक व महीला पदाधिकारी आणि शिक्षक उपस्थित होते.



