
चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ
चिपळूण तालुक्यातील गांधारेश्वर नदीवरील पुलावर एका महिलेची चप्पल, पर्स आणि मोबाईल सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेने चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात खळबळ उडाली आहे.ही महिला घरात कोणालाही काही न सांगता निघून गेली होती, त्यामुळे तिच्या पतीने ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, संगमेश्वर येथील रहिवासी असलेली अपेक्षा अमोल चव्हाण ही काल सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेली. तिच्या पतीने, अमोल चव्हाण यांनी तात्काळ संगमेश्वर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तिच्या मोबाईल लोकेशनची तपासणी केली असता, तिचे शेवटचे लोकेशन चिपळूण येथील गांधरेश्वर पुलावर दिसून आले.
या माहितीनंतर, अपेक्षाचे कुटुंब तातडीने गांधारेश्वर पुलावर पोहोचले. तिथे त्यांना पुलावर अपेक्षाची चप्पल आणि पर्स सापडली, ज्यामुळे त्यांनी चिंता व्यक्त केली.




