
किक बॉक्सिंग स्पर्धेत जीजीपीएस गुरुकुलचे सुयश
महाराष्ट्र किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्यामार्फत दि. २० व २१ सप्टेंबर २०२५ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत शहारातील जीजीपीएस प्रशालेच्या कै. बाबुराव जोशी गुरुकुल प्रकल्पातील विद्यार्थ्यांनी विविध गटात घवघवीत यश संपादन केले.
कु. चिन्मय प्रणित करगुटकर याने ४७ किलोखालील वजनी गटात लाईट कॉन्टॅक्टमध्ये एक सुवर्ण व किक लाईटमध्ये एक रौप्य पदक मिळवले. कु. ओम केतन विलणकर याने ३७ किलोखालील वजनी गटात एक सुवर्ण पदक मिळवले. कु. ऋषिल प्रशांत शेलार याने ६२ किलोखालील वजनी गटात किक लाईट प्रकारात एक रौप्य व लाईट कॉन्टॅक्ट प्रकारात एक कास्य पदक मिळवले.
या तीनही विद्यार्थ्यांची आता राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. प्रशालेसाठी ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. या विद्यार्थ्यांना सदर क्रीडा प्रकारासाठी प्रशालेतील क्रीडा शिक्षक श्री. कौशल मोहिते यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गुरुकुल विभाग प्रमुख श्री. वासुदेव परांजपे, जीजीपीएस प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. सोनाली पाटणकर व र. ए. सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.




