
चिपळुणात विज बिल थकल्याने मीटर कट करण्यास गेलेल्या महावितरणाच्या अधिकाऱ्याला दाम्पत्याची मारहाण
- वीज बिल थकीत असल्याने मीटर कट करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्यावर दाम्पत्याने हल्ला केल्याची घटना चिपळूण शहरात घडली. या प्रकरणी साजिद ए. रज्जाक मुकादम आणि वफा साजिद मुकादम या दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेठमाप मोहल्ल्यातील सालिहा मंजिलमध्ये राहणाऱ्या साजिद मुकादम यांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे महावितरणचे अधिकारी विवेक पवार आणि त्यांचे सहकारी अंकुश घोटाळे कनेक्शन कट करण्यासाठी गेले.
दरम्यान, विवेक पवार मीटरजवळ गेले असता वफा मुकादम यांनी त्यांच्यावर काठीने हल्ला केला. फटका चुकवण्याचा प्रयत्न करताना त्यांच्या कानाला दुखापत झाली. त्याचबरोबर मीटरची मोडतोड करण्यात आली. साजिद मुकादम यांनीही अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली असल्याचे समोर आले आहे.




