
सौ. पूजा पवार आयोजित “देवी मातांची दर्शन यात्रा” उपक्रमाला प्रारंभ
रत्नागिरी : शिवसेना महिला शहर संघटक सौ. पूजा दीपक पवार यांच्या पुढाकाराने शहरातील प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या देवी मातांची दर्शन यात्रा या उपक्रमाचे उद्घाटन आज (२३ सप्टेंबर) करण्यात आले. आज सकाळी ९ आणि १० वाजता पहिली बस एसी बस (२३ सप्टेंबर) मार्गस्थ झाली.
राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सलग चौथ्या वर्षी प्रभाग क्रमांक ५ व ६ मधील महिलांसाठी देवींच्या दर्शनाचा योग सौ. पूजा दीपक पवार यांनी सलग चौथ्या वर्षीही जुळवून आणला आहे. “देवी मातांची दर्शन यात्रा” हा उपक्रम राबवत त्यांनी श्री भगवती देवी, महालक्ष्मी, जुगाई, नवलाई आणि साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आडिवरेची महाकाली देवी या पाच देवींच्या दर्शनाचा सोहळा २३ आणि २४ सप्टेंबर रोजी आयोजित केला आहे. त्यातील पहिली बस आज (२३ सप्टेंबर) मार्गस्थ झाली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे, माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, महिला शहर संघटक सौ. पूजा पवार, उपविभाग प्रमुख सुनील शिवलकर, सौ. काव्या कामतेकर, उपविभाग प्रमुख विशाल सावंत, मौलवी नदाफ, श्रीयोग चव्हाण, वेदांत सावंत, सुरेश यादव, तेजल पाटील, अंजली सावंत, श्वेता यादव, श्री. नलावडे, संतोष शिंदे, रोहित शिंदे, शौर्य मांजरेकर, जितेंद्र मोडक, यश पवार यांच्यासह प्रभाग ५ आणि ६ मधील सर्व पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.
या प्रसंगी देवी दर्शनासाठी निघालेल्या महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. दरम्यान, उद्याही (२४ सप्टेंबर) सकाळी ९ वाजता क्रांतीनगर महालक्ष्मी मंदिर आणि सकाळी १०वाजता ऍक्टिव्हिटी सेंटर येथून एसी बस सोडण्यात येणार आहेत.




