
रायगड जिल्ह्यातील खैर तस्करी प्रकरणी मंडणगड तालुक्यातील पाच जण वनविभागाच्या ताब्यात
रायगड जिल्ह्यातील खैर तस्करी प्रकरणी मंडणगड तालुक्यातील पाच जणांना रायगड वनविभागाने १० लाखांचा मुद्देमाल व एक वाहन ताब्यात घेतले.वनपरिक्षेत्र खालापूर परिमंडळ उंबरे येथे खैराच्या चोरीप्रकरणी तस्करी करणारे पाचजण गुंतल्याची माहिती रायगड वनविभागाला मिळाल्याने कारवाई करण्यात आली. शेतकर्यांच्या मालकीच्या जमिनीतून परस्पर चोरीच्या इराद्याने खैराची झाडे तोडून नेल्याच्या तस्करी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईने तस्करी करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.खैराची चोरी व विनापरवाना वाहतूक केल्यास वाहन जप्ती, आर्थिक व्यवहार तपासणी, बँक खाती गोठवणे इत्यादी स्वरूपाची रितसर कार्यवाही करण्यात येईल असे वनविभागाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.www.konkantoday.com




