
दापोलीतील चरस तस्करी प्रकरणात तरूण ठाणे पोलिसांच्या ताब्यात
दापोली तालुक्यातील एक तरूण चरस तस्करीप्रकरणी ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला आहे. मसुद बदुद्दीन ऐनरकर (२९, रा. अपनानगर, खोडा-दापोली) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १ किलो १०६ ग्रॅम चरस व इतर वस्तूंसह एकूण १ कोटी १० लाख ८० हजार ४२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अंमली पदार्थ तस्करीविषयी गुप्त माहिती पोलीस हवालदार अमोल देसाई यांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील शिळफाटा परिसरात हावरे सिटीसमोरील सार्वजनिक रस्त्यावर सापळा रचण्यात आला. मसुद ऐनरकर रत्नागिरी जिल्ह्यातून ठाण्याकडे तस्करीसाठी चरस घेवून येत असताना पोलिसांनी झडप टाकून त्याला ताब्यात घेतले. तपासणीदरम्यान त्याच्याकडे विक्रीसाठी ठेवलेला चरस सापडला. चरस हा अंमली पदार्थ सहसा विदेशातून भारतात तस्करी करून आणला जातो.www.konkantoday.com




