चिपळूण तालुक्यातील पिंपळी-खडपोली रस्त्यावरील अवजड वाहनांची ट्रायल.
चिपळूण तालुक्यातील पिंपळी-
खडपोली रस्त्यावरील पूल कोसळल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून सध्या वापरात असलेला खडपोली गावातील रस्ता पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या विरोधामुळे चर्चेत आला आहे. आज पोलिसांच्या समोर अवजड वाहनांना बंदी करून २० टन वजनाची वाहने सोडण्याचे ठरले असताना आज सोमवारी रिकाम्या अवजड वाहनांची ट्रायल घेण्यात आली. यामुळे येथील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. चिपळूण-कराड रस्त्यावर अनेक टँकर वाहतुकीसाठी उभे करण्यात आले.
मागील महिन्यात पिंपळी-खडपोली रस्ता कोसळला यामुळे १३ गावांचा संपर्क तुटला. कामगारांना अडचण झाली. महत्वाचे म्हणजे कारखान्यातील उत्पादनांवर त्याचा परिणाम झाला. यामुळे हा पूल पाऊस संपल्यानंतर तत्काळ बांधण्याचे आश्वासन पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले. खडपोली आणि वालोटी मार्ग मर्यायी असेल, असे प्रशासनाने जाहीर केले. त्यामुळे हेच दोन मार्ग वापरात होते. यातील खडपोली हा रस्ता अधिक सोयीचा होता. या मार्गावरून गाडीच्या वजनासह २० टन वाहतूक करणार्या गाड्यांना परवानगी देण्यात आली. कारखान्यातील माल वाहतूक ही रात्रीची करावी. त्यामुळे ही वाहतूक रात्री १२ ते सकाळी ६ वा. अशी होत आहे.
www.konkantoday.com