
चिपळुणातील घंटागाड्यांवर दुर्गंधी रोखण्यासाठी आता ताडपत्रीचे आवरण
चिपळूण शहरातून कचरा संकलन करताना वार्यामुळे तो उडू नये तसेच दुर्गंधी पसरू नये, म्हणून घंटागाड्यांवर ताडपत्री टाकण्याची अट कर्मचार्यांना घालण्यात आली आहे. याची अंमलबजावणी न करणार्या कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा इशारा नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
शहरातून दरदिवशी १५ टन कचरा उचलला जातो. यात ९ टन सुका तर ६ टन ओला कचरा असतो. ओल्या कचर्यातील ४ टन कचर्यापासून बायोगॅस, तर २ टन कचर्यापासून सेंद्रिय खत तयार केले जाते. कचरा उचलण्यासाठी नगर परिषदेकडे ५७ कायमस्वरूपी तर ९८ ठेकेदारी कर्मचारी आहेत. तर १२ हून अधिक घंटागाड्या आहेत. या सर्व यंत्रणेमुळे शहरात कायम स्वच्छता दिसून येते. ही स्वच्छता कायम राखण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले, प्रशासकीय अधिकारी मंगेशल पेढांबकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते प्रयत्न करीत आहेत.
www.konkantoday.com




