
कुणबी समाजोन्नती संघाच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणाविरोधात एल्गार मोर्चा, ९ ऑक्टोबरला आझाद मैदानावर धडकणार
राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी समाजाच्या आरक्षणात समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय व हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी यामुळे कुणबी समाज आक्रमक झाला आहे. आपल्या हक्कांच्या संरक्षणासाठी कुणबी समाजोन्नती संघाच्या नेतृत्वाखाली ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर ×एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाला कोकणासह राज्यभरातील कुणबी संघटनांचा उत्स्फुर्त पाठिंबा दिला असून मोठ्या संख्येने समाजबांधव हजेरी लावणार असल्याचे सांगितले जात आहे.
यावेळी कुणबी समाजाचे सर्व प्रमुख नेते उपस्थित राहून सरकारला ताकद दाखवणार आहेत. मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राज्यभर मराठा समाजाला कुणबी दाखले दिले जात आहेत. या प्रक्रियेमुळे मुळ कुणबी समाजावर अन्याय होत असल्याचा आरोप कुणबी समाज नेत्यांनी केला आहे.
या आधी ओबीसी समाजाने अनेकदा मोर्चे व आंदोलनाद्वारे सरकारला इशारा दिला होता. मात्र सरकारने हैद्राबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्यावर ठाम राहिल्याने आता कुणबी समाज स्वतंत्र पातळीवर एल्गार मोर्चा काढून ताकद दाखवणार आहेत.
www.konkantoday.com




