
रत्नागिरी जिल्ह्यात आजपासून नवरात्रौत्सवाचा जागर, गरब्याची धूम सुरू होणार मात्र पावसाचे सावट
रत्नागिरी जिल्ह्यात आज घटस्थापनेपासून सर्वत्र नवरात्रौत्सवाचा जागर रंगणार आहे. जिल्ह्यात ४३६ सार्वजनिक तर ६५ खाजगी अशा एकूण ५०१ ठिकाणी दुर्गामातेच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. ४२४ सार्वजनिक आणि १९,३१५ खाजगी ठिकाणी घटस्थापना आणि प्रतिमा पूजन करण्यात येणार आहे. ९ दिवस दांडिया आणि गरब्याची धूम सुरू राहणार आहे.
जिल्हयात ग्रामदेवतांच्या मंदिरामध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना केली जात आहे. या उत्सवाच्या ठिकाणी दांडियाचे कार्यक्रम करण्याची प्रथा मागील काही वर्षापासून वाढीस लागली आहे. काही भागांमध्ये ग्रामदेवतेच्या मंदिरासमोर हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शहरामध्ये तर गल्लोगल्ली व काही भागांमध्ये उत्सव साजरे करण्याचे प्रमाण वाढले आहे.
www.konkantoday.com




