
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना रविवारसहित १२९ दिवस सुट्या
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळांना रविवारसहित १२९ दिवस सुट्या आहेत. त्यात दिवाळीची सुटी १६ ते २७ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. शालेय शिक्षण विभागाने २०२५-२६ च्या शैक्षणिक वर्षातील सार्वजनिक सुट्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात ५३ रविवार आणि सण-उत्सव, महापुरूषांच्या जयंती अशा ७६ सुट्या आहेत. त्यात उन्हाळ्याच्या सुट्या देखील समाविष्ठ आहेत. शैक्षणिक वर्षातील किमान २२० दिवस अध्यापनाचे कार्य व्हावे, असे अपेक्षित आहे. पण, उन्हाळा सुट्यांपूर्वी बहुतेक शाळा पहिली ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची अंतिम सत्र परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात उरकत होत्या. त्यामुळे साधारणत: २० एप्रिल ते १४ जून अशी उन्हाळा सुटी असायची. पण, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अंतिम सत्र परीक्षा ८ ते २५ एप्रिल या काळात घ्यावी, असे आदेश काढले आहेत. त्यामुळे अध्यापनाचे दिवस नियमानुसार पूर्ण होतील असा त्यामागील उद्देश आहे.



