
मिरजोळे येथील लक्ष्मीकांतवाडी नवरात्र उत्सव मंडळाच्या उत्सवास प्रारंभ
रत्नागिरी : मिरजोळे (ता. रत्नागिरी) येथील लक्ष्मीकांतवाडी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत श्री दुर्गा देवीचा उत्सव साजरा केला जाणार आहे. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत दररोज सकाळी ८ वाजता देवीची पूजा व आरती आणि सायंकाळी ७ ते ८ यावेळेत देवीची आरती होईल. यानिमित्त २३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
२३ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ९ यावेळेत लक्ष्मीकांतवाडी भजन मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. रात्री ९ ते १० यावेळेत दांडियारास होईल. त्यानंतर रात्री १० वाजता ढोलवादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २४ सप्टेंबर रोजी झरेवाडी येथील कालभैरव महिला मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होईल. २५ ते २७ सप्टेंबर या कालावधीत दररोज रात्री ८ वाजता भजन, तर रात्री ९ वाजता दांडियारास रंगेल. २८ सप्टेंबरला दुपारी १२ ते ४ यावेळेत महाप्रसादाचे वाटप केले जाईल. रात्री ८ वाजता महिलांसाठी कार्यक्रम होतील. २९ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता दांडियारास होईल. त्यानंतर रात्री १० वाजता रेकॉर्ड डान्स होईल. ३० सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता दांडिया आणि त्यानंतर १० वाजता फॅन्सी ड्रेस कार्यक्रम होईल. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता दांडिया आणि त्यानंतर १० वाजता फनी गेम्स होतील. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता देवीची विसर्जन मिरवणूक निघेल.
सर्व भाविकांनी दर्शनाचा आणि सादर होणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन लक्ष्मीकांतवाडी नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




