पंजाबमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठीभाकरसेवा संस्थेचे पथक रवाना

पंजाब येथील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रत्नागिरीतील भाकरसेवा संस्थेचे एक पथक रवाना झाले आहे. आपत्तीमध्ये बाधित झालेल्यांना या पथकाद्वारे मदत केली जाणार आहेयेथील भाकर संस्थेने सामाजिक बांधिलकी जपत नैसर्गिक आपत्तीवेळी धाव घेऊन मदतीचा हात दिला आहे. गुजरात भूकंप मदतकार्य, सोलापूर दुष्काळ, चिपळूणमधील महापूर, कोविड मदतकार्य अशा ठिकाणी भाकरचे पथक पोहोचून आवश्यक ती सर्व मदत करत आले आहे. गेल्या चार दशकांतील सर्वात भीषण पूरस्थिती सध्या पंजाबमधील २२ जिल्ह्यांमध्ये उद्भवली आहे. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
घरे, शाळा, शेतजमिनी आणि उपजीविका उद्ध्वस्त झाल्या आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन भाकरचे पथक पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज रवाना झाले आहे. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, भाकर कार्यकर्ते, संस्थेचे संचालक मंडळ आणि संस्थेमार्फत मोलाची मदत पाठवली आहे. या पथकात संस्थेचे संस्थापक देवेंद्र पाटील, पारस पोवार, श्रेयश घाटगे, प्रतीक घाटगे, श्रीधर पाटील यांनी सहभाग घेतला आहे. याबाबत अधिक माहितीसाठी संस्थेचे संचालक पवनकुमार मोरे यांच्याकडे संपर्क करावा तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन भाकरतर्फे केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button