
कोकण मराठी साहित्य परिषदेचा कवी उमाकांत कीर स्मृती पुरस्कार प्रसिद्ध कवी अरुण मोर्ये यांना जाहीर
वार्षिक पारितोषिक पुरस्कार वितरण सोहळ्यात होणार सन्मान
खंडाळा : कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी साहित्यिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांना सन्मानित करण्यात येते.
त्या अनुषंगाने कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या युवाशक्तीचे दक्षिण कोकण प्रमुख तथा प्रसिद्ध मोर्ये, गझलकार, लेखक अरुण तुकाराम मोरे यांना जाहीर झाला आहे.
अरुण तुकाराम मोर्ये हे मागील अनेक वर्ष सातत्याने साहित्य क्षेत्रामध्ये कवितेच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करत असून, त्यासाठी विविध विषयावर त्यांनी आतापर्यंत कविता सादर केले आहेत. त्यासोबतच दैनंदिन जीवनामधील प्रश्न आपल्या कवितेच्या माध्यमातून मांडताना कविता जगण्याला दिशा देते, हे त्यांनी आपल्या कविता लेखनातून दाखवून दिले आहे. त्यांचे आतापर्यंत चारोळी संग्रह, कवितासंग्रह, नाटके इत्यादी साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक ठिकाणी विविध काव्य कार्यशाळा घेतल्या आहेत. तसेच कवितांचे कार्यक्रम सादर केले आहेत. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने उमेदीच्या गुणवंत कवीस देण्यात येणारा कवी उमाकांत कीर स्मृती काव्य पुरस्कार हा नुकताच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय समितीच्या अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, केंद्रीय कोषाध्यक्ष प्रकाश दळवी, केंद्रीय कार्यवाह माधव अंकलगे, दीपा ठाणेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अगदी सहज आणि सोप्या शब्दात सामाजिक वेदना मांडत, कवितेच्या माध्यमातून कविता लिहीणा-या कवी अरुण तुकाराम मोर्ये यांना जाहीर झालेल्या या पुरस्काराबाबत त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.




