
रत्नागिरी पोलीसांचा सतर्कतेचा इशारा : बंद घरांमध्ये दिवसा घरफोड्या
रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील हातखंबा व पाली परिसरात दिवसा घरफोडीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. दिनांक १७ व १९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी २ ते संध्याकाळी ७ वाजेच्या दरम्यान बंद घरांचे दरवाजे, कुलूप तोडून व लोखंडी कपाटे उचकटून चोरी करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर पोलीसांनी नागरिकांना सतर्क व जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
🔸 दिवसा घर कुलूप लावून बाहेर जाताना घरामध्ये मौल्यवान वस्तू ठेवू नयेत.
🔸 घरांची सुरक्षा व्यवस्था तपासून मजबूत करावी.
🔸 सीसीटीव्ही कॅमेरे असल्यास ते सुरु आहेत याची खात्री करावी.
🔸 अनोळखी व्यक्ती, भिकारी, झोळी घेऊन फिरणारे ज्योतिषी, भाडेकरू, फिरते विक्रेते, कामगार, किंवा गावात कार / दुचाकीवरून पत्ते विचारत रेंगाळणारे लोक संशयास्पद वाटल्यास तात्काळ 112 वर कॉल करून पोलिसांना माहिती द्यावी.
पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, घर बंद करून जाताना शेजाऱ्यांना सतर्क राहण्यास सांगावे व रात्री घर रिकामे ठेवताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवाव्यात.
“सावधान रहा – जागरूक रहा” असा संदेश देत पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.




