
दापोली नवरात्रोत्सवासाठी सज्ज, ३३ दुर्गा मूर्तीची प्रतिष्ठापना होणार
गणेशोत्सवानंतर आता तालुका नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाला आहे. तालुक्यात एकूण ३३ सार्वजनिक दुर्गा माता मंडळांकडून देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
२२ सप्टेंबर रोजी घटस्थापना होणार असून ३ ऑक्टोबर रोजी श्री देवी दुर्गामातेच्या मूर्तीची विसर्जन मिरवणूक निघणार आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये या सर्व मंडळांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या काळात विशेषतः गरबा नृत्याचे आयोजन केले जाते. दापोलीतील नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होतात.
गणेशोत्सवातही मूर्तीच्या किंमतीत वाढ झाली होती. फळे, भाज्या व
सजावटीसाठी लागणारे साहित्य महाग झाले होते. नवरात्रोत्सवातही भक्तांना महागाईचा सामना करावा लागणार आहे. खण-ओटीसाठी लागणार्या नारळांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. दरम्यान, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी दापोली पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रीत केले असून पोलीस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे.www.konkantoday.com




