जपानमधील आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेचे उद्घाटन संपन्न; ना. उदय सामंत ह्यांची उपस्थिती

जपानच्या ओसाका शहरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग परिषद व प्रदर्शनात (The International Industry Conference and Expo) महाराष्ट्र पॅव्हेलियनचं उद्घाटन आज महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या हस्ते पार पडले.

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात ५ ट्रीलियनची आर्थिक व्यवस्था बनेल, देशाच्या आर्थिक घोडदौडीमध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा हा महाराष्ट्राचा आहे. महाराष्ट्र राज्य स्वतः १ ट्रीलियन अर्थव्यवस्था बनवून देशात सर्वाधिक बलाढ्य राज्य असल्याचं मतं मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी व्यक्त केलं.

आंतरराष्ट्रीय उद्योग परिषदेत १५० हून अधिक देश सहभागी झाले असून जागतिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र केंद्रबिंदू ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button