
प्रवाशांच्या खिशाला चटका!, एसटी भाडेवाढीमुळे तुमचा प्रवास आता महागणार!
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) एसटी बसच्या तिकीट दरात सुमारे 15% वाढ जाहीर केली. ही दरवाढ लालपरी, शिवशाही, शिवनेरीसह सर्व प्रकारच्या बसेसना लागू असून, वाढते खर्च हे यामागील प्रमुख कारण असल्याचे म्हटले आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) ने एसटी बसच्या तिकीट दरामध्ये सुमारे 15% वाढ जाहीर केली आहे. ही दरवाढ 25 जानेवारी 2025 पासून जाहीर केली असली, तरी आता प्रत्यक्षात ती अंमलात आणली जात आहे.एसटी महामंडळाने स्पष्ट केलं आहे की, ही दरवाढ केवळ लालपरीपुरती (साधी एसटी) मर्यादित नाही, तर शिवशाही, शिवनेरी, आणि शिवनेरी स्लीपर (AC बस) यांच्यावरही लागू केली गेली आहे. त्यामुळे ग्रामीण भागापासून शहरांपर्यंत सर्वच प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.




