
नुपूर दफ्तरदारला तायक्वांदोमध्ये गोल्डमेडल
रत्नागिरी : खेडशी येथील पुष्पदत्त इंग्लिश मिडीयम स्कुल,रत्नागिरीची विद्यार्थीनी कु. नुपूर निलेश दफ्तरदार हिने जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा (तायक्वांदो) मध्ये प्रथम क्रमांक मिळवून गोल्ड मेडल पटकावले. तसेच तिची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाली आहे. यासाठी तिचे शिक्षक व पालकांनी मेहनत घेतली. त्याबद्दल तिचे शाळा आणि संस्थेच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे.




