धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ मोहिमेतर्गत आरोग्य तपासणी शिबिर

प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड अंतर्गत आरोग्य उपकेंद्र धामणसे येथे ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबीर धामणसे ग्रामपंचायातीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री. अनंत जाधव यांचे उपस्थितीत व सदस्य श्रीम तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पणकुटे यांचे मार्गदर्शना खाली व उपस्थिती करण्यात आले. या शिबिरामध्ये गावातील महिलांची सर्वसाधारण आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक त्या सल्ल्यांसह उपचाराची मार्गदर्शन करण्यात आले.

आरोग्य पथकाने रक्तदाब, हिमोग्लोबिन, मधुमेह तपासणीसह स्त्रीरोग विषयक तपासण्या केल्या. महिलांना संतुलित आहार, नियमित व्यायाम, मानसिक आरोग्य आणि कुटुंबाच्या आरोग्यातील त्यांच्या भूमिकेविषयी मार्गदर्शन करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी शिबिराचे आयोजना विषयी तसेच करण्यात येणाऱ्या तपासणी विषयी माहिती दिली.

या उपक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी आरोग्य विषयक शंका विचारून समाधानकारक उत्तरे मिळवली. ग्रामीण भागात महिलांचे आरोग्य सक्षम झाल्यास कुटुंब व समाज अधिक सक्षम होतो, हा संदेश या शिबिरातून देण्यात आला.

👉 “स्वस्थ नारी म्हणजेच सशक्त परिवार” या बोधवाक्याने हे शिबिर यशस्वीपणे पार पडले.या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल पनकुटे, आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर, अंगणवाडी मुख्यसेविका श्रीम. काळकर, cho श्रीम गीतांजली मायशेट्ये, आरोग्य सेविका श्रीम. नेत्रा चव्हाण, अर्चना आपकरे, आरोग्य सेवक श्री. विक्रम पार्टे, लॅब टेक्निशियन श्रीम मोहित, आशा श्रीम जाधव श्रीम. ईरमल, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button