ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ डॉ. हेमा साने यांचे निधन!

पुणे : ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ आणि विजेचा व विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर टाळून निसर्गाशी एकरूप होऊन जीवन व्यतीत करणाऱ्या डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे आज, शुक्रवारी (१९ सप्टेंबर) निधन झाले. त्या अविवाहित होत्या.

हेमा साने यांचा जन्म १३ मार्च १९४० रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम. एस्सी. पी‌एच.डी. संपादन केली होती. भारतविद्या शास्त्रात त्यांनी एम.ए., एम.फिल. केले होते. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात अध्यापन कार्य केलेल्या साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या.

निसर्गप्रेमी साने यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला होता. पुण्यातील जोगेश्वरी मंदिरासमोरील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात त्या राहत. वाड्यात त्यांच्याबरोबर चार मांजरे, एक मुंगुस, एक घुबड, भारद्वाज, साळुंकी, नाचण, दयाळ, वटवट्या अशा पक्ष्यांचाही निवास होता.

पर्यावरणपूरक जीवनशैलीचा पुरस्कार करणाऱ्या हेमा साने यांनी विजेचा वापर केला नाही. त्यामुळे घरात विजेचा दिवा, दूरचित्रवाणी संच, रेफ्रिजिरेटर, वॉटर हीटर, मायक्रोवेव्ह, मिक्सर यांसारखी आधुनिक उपकरणेही नव्हती. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी लुना हे वाहन वापरले. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. त्या विहिरीवरून पाणी आणत. त्यांनी दूरध्वनीही वापरलेला नव्हता. केवळ दिवसाच्या सूर्यप्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतिशास्त्र आणि पर्यावरण या विषयांवरच नव्हे, तर इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर मिळून तीसहून अधिक पुस्तके लिहिली. अलीकडे त्या सौर ऊर्जेवर चालणारा दिवा वापरू लागल्या होत्या.

हेमा साने यांची ग्रंथसंपदा

  • आपले हिरवे मित्र
  • पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष (सहलेखिका – डॉ. विनया घाटे)
  • बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष
  • वा. द. वर्तक यांनी संपादित केलेल्या ‘शंभरेक संशोधन प्रबंधां’तील काही प्रबंध
  • सम्राट अशोकावरील ‘देवानंपिय पियदसी राञो अशोक’ हे पुस्तक

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली क्रमिक पुस्तके

बायोलॉजी (सहलेखिका – वीणा अरबाट)

इंडस्ट्रीयल बॉटनी (सहलेखिका – डॉ. सविता रहांगदळे)

प्लांट

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button