
गाडी 20 वर्षांची झाली तरीही टेन्शन नाही;
वीस वर्षे जुनी गाडी चालवण्यास आता परवानगी मिळणार असली तरी त्यासाठी वाहनमालकांना काही आवश्यक अटी पाळाव्या लागणार आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या नियमांनुसार वाहनाचे वय वाढल्यावर प्रदूषण नियंत्रण, सुरक्षितता आणि नोंदणी नूतनीकरण या बाबींना अधिक महत्त्व देण्यात येणार आहे.त्यामुळे 20 वर्षांचा टप्पा पूर्ण केलेल्या गाड्यांसाठी नोंदणीचे नूतनीकरण अनिवार्य ठरणार असून यासाठी वाहनमालकांना नेहमीपेक्षा दुप्पट शुल्क भरावे लागेल.
वाहन नूतनीकरण प्रक्रियेत सर्वप्रथम ‘फिटनेस टेस्ट’ होणार आहे. या तपासणीत गाडीचे इंजिन, ब्रेक, लाईट, टायर यांची कार्यक्षमता तपासली जाईल तसेच प्रदूषण उत्सर्जन (PUC) ठरावीक निकषात आहे का हे काटेकोर पाहिले जाणार आहे. फिटनेस प्रमाणपत्र मिळाल्यासच गाडी रस्त्यावर ठेवता येणार आहे. यासाठी वेगळे शुल्क आकारले जाईल. खासगी वाहनांसाठी हे शुल्क जास्त असेल, तर व्यावसायिक गाड्यांसाठी आणखी कडक अटी घालण्यात आल्या आहेत.