
खेड शहराजवळ असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात, कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
खेड शहराजवळ असलेल्या भरणे नाका परिसरात आज सायंकाळी भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अशा घटना घडत असल्याचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सायंकाळी ६.३० च्या सुमारास हा अपघात घडला. शांताराम गोरीविले (रा. खेड तालुका) आणि त्यांचा सहकारी शांताराम तांबट दुचाकीने जात असताना, पाठीमागून येणाऱ्या ‘कंटेनर’ने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेमुळे दुचाकीस्वार शांताराम गोरीविले हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.




