रत्नागिरी शहरातील विविध नागरी समस्या संदर्भात मनसेचीनगरपरिषदेच्या मुख्यालयावर धडक

आज मनसे पदाधिकाऱ्यांनी मनसे तालुका अध्यक्ष श्री. रुपेश जाधव, शहर संघटक श्री. अमोल श्रीनाथ यांच्या नेतृत्वात शहरातील दुरावस्था झालेल्या अंतर्गत रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती तसेच प्रलंबित घनकचरा व STP ( सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) अनधिकृत परप्रांतीय फेरीवाल्यांच्या टपऱ्या-अतिक्रमणे इ.महत्वपूर्ण समस्यांसंदर्भात तत्परतेने कारवाई करण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. वैभव गारवे यांची भेट घेऊन मनसे स्टाईलने जाब विचारण्यात आला.
यावेळी मनसे पक्षाच्या वतीने नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत सखोल चर्चा करण्यात आली.या चर्चेत मनसेच्या वतीने प्रश्नासनाला निदर्शनास आणून देण्यात आले की रत्नागिरी शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांची अवस्था अतिशय बिकट असून त्याचा मनस्ताप येथील करदात्या नागरिकांना आता असहाय्य झाले आहे व याची जाणीव रत्नागिरी नगर परिषदेच्या ढिम्म प्रशासनाला होत नसून त्यामुळे अनेक नागरिकांचे वाहनाचे अपघात, वाहनांचे देखभालीचे खर्च, मनस्ताप आदींचा सामना नगरपरिषदेला कर भरणा करून देखील करावा लागत आहे. तसेच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तसेच रत्नागिरी शहरासाठी अत्यंत महत्वपूर्ण असलेला घनकचरा प्रकल्प, STP ( सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प) देखील अद्यापही प्रलंबित आहे त्याबाबतची सत्य परिस्थिती नागरिकांना अवगत करावी यासाठी न. प. प्रशासनाने याबाबत श्वेत पत्रिका काढून लोकांना आश्वासित करावे, याचबरोबर रत्नागिरी नगर परिषद हद्दीमधील परप्रांतीय फेरीवाले त्यांच्या अनधिकृत टपऱ्यांच्या अतिक्रमणाचे प्रमाण वाढले असून याबाबत नगर पालिका प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी..या आग्रही अणि स्पष्ट मागण्या मनसेकडून करण्यात आज करण्यात आल्या. याबाबत नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरात लवकर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलने निषेध नोंदवला जाईल व याप्रसंगी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सर्वस्वी आपले नगरपरिषद प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा यावेळी देण्यात देण्यात आला.
याप्रसंगी नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव गारवे यांना निवेदन देताना मनसे रत्नागिरी तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव, शहर संघटक श्री अमोल श्रीनाथ, तालुका सचिव अभिलाष पिलणकर, शहर उपाध्यक्ष श्री. राजेश नंदाने , श्री. राहुल खेडेकर, विभाग अध्यक्ष सोम पिलणकर , श्री. आदित्य चव्हाण, अक्षय सुतार, श्री. सर्वेश जाधव, सागर मयेकर आदी पदाधिकारी महाराष्ट्रसैनिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button