
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे तुटलेल्या तारेचा शॉक लागून गायीचा मृत्यू
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे सोमवारी सकाळी झालेल्या अपघाताने पुन्हा एकदा महावितरण कंपनीच्या निष्काळजी कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शेतकरी रघुनाथ गुरव यांची दुभती गाय शेतात पडलेल्या तुटक्या विजेच्या तारेच्या संपर्कात येवून मृत्यूमुखी पडली. ही घटना सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
गुरव आपली जनावरे चारण्यासाठी शेतात घेवून गेले असता, विद्युत प्रवाह सुरू असलेली तार शेतात पडलेली होती. या तारेचा गायीला स्पर्श होताच काही क्षणात तिचा मृत्यू झाला. या अपघाताच्या वेळी गायीची दोरी मुलगा विनायक याच्या हातात होती. परंतु नशिब बलवत्तर म्हणून ते थोडक्यात या धक्यातून बचावले. विचोच्या तारांच्या वेळेवर दुरूस्तीसंदर्भात महावितरण सतत निष्काळजीपणा करत असल्याने असे अपघात वारंवार घडत असल्याचे पहायला मिळत आहे.www.konkantoday.com




