
पांगरे बुद्रुक येथे महिलांच्या सुरक्षेसंदर्भात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती कार्यक्रम
रत्नागिरी, दि. 18 ):- राजापूर तालुक्यातील पांगरे बुद्रुक ग्रामपंचायत कार्यालयात 17 सप्टेंबर रोजी “महिलांची सुरक्षा” आणि “पीडित भरपाई योजना” या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे प्रमुख सचिव आर. आर. पाटील, बाल संरक्षण अधिकारी प्रदीप मांडवकर, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव उपस्थित होते.
श्री. पाटील यांनी या प्रसंगी पीडित भरपाई योजना तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत सदस्य, परिचारिका तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.