
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिनीदक्षिण रत्नागिरी भाजयुमोतर्फे रक्तदान शिबिर
रत्नागिरी : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दक्षिण रत्नागिरी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे आयोजित रक्तदान शिबिरात ३२ जणांनी रक्तदान केले. भाजयुमो जिल्हाध्यक्ष मंदार खंडकर यांच्या नेतृत्वात हे शिबिर जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या रक्तपेढीत आयोजित केले होते. भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसापासून देशभरात विविध सेवा उपक्रमंचे आयोजन करण्यात येत आहे. यानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चाने विविध कार्यक्रमांचे नियोजन रत्नागिरीत केले आहे. रक्तदान शिबिराबद्दल मंदार खंडकर यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले असून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंत्री नीतेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या नियोजनात विविध सेवा कार्यक्रम होणार आहेत.
रक्तदान शिबिराच्या नियोजनासाठी भाजयुमोचे सितेश पर्शराम, सिद्धाय मयेकर, अथर्व करमरकर, ओमकार भाताडे, सिद्धेश वाडेकर, पार्थ पंडित, तकदीर जागीरदार, प्रथमेश सुर्वे, प्रथमेश सागवेकर, रोहन वाडेकर, दुर्गेश पिलणकर, अभिजीत पटवर्धन, अनिश केतकर, विदेश गाडगीळ, संदेश माचीवले, सागर बोरकर, रोहन वाडकर, अक्षय पाचकुडे, किशोर गिरी, संकेत कदम, पूनम भिडे यांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी विनोद म्हस्के, रूपेश कदम, प्रणाली रायकर, सुप्रिया रसाळ, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, उमेश देसाई, मंदार मयेकर, राजेश तोडणकर, मुन्ना चवंडे, समीर करमरकर, दादा ढेकणे, वर्षा ढेकणे, राजन फाळके, उमेश देसाई, चिराग खटकूळ, राजू भाटलेकर, समीर सावंत, पुंडलिक पावसकर, नीलेश आखाडे, प्रसाद बाष्टे, अशोक वाडेकर, संतोष सावंत, शैलेश बेर्डे आदी उपस्थित होते.




