
देवळे (संगमेश्वर) येथे आमदार किरण सामंत यांचा गाव भेट दौरा
संगमेश्वर : तालुक्यातील देवळे येथे आमदार किरण सामंत यांनी गाव भेट दौऱ्यादरम्यान ग्रामस्थांशी संवाद साधला. या भेटीत नागरिकांनी रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण, शेतीसंबंधी अडचणी अशा विविध समस्या मांडल्या. आमदार सामंत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच जनतेच्या अडचणी सोडवणे ही माझी जबाबदारी असून गावोगावी जाऊन थेट लोकांच्या समस्या ऐकून त्यावर काम करणार असल्याचे ते म्हणाले. गावातील प्रलंबित कामे, शासकीय योजनांचा लाभ आणि विकास प्रकल्पांचा आढावा घेऊन आमदारांनी गतीमान विकासाचे आश्वासन दिले.
देवळे येथे झालेल्या गाव भेट दौऱ्यात आमदार किरण सामंत यांच्यासमोर ग्रामस्थांनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, वीज पुरवठा, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी, शिक्षण व आरोग्य सुविधा अशा अनेक प्रश्नांवर नागरिकांनी आपली मते व्यक्त केली.
ग्रामस्थांचे मनोगत ऐकून आमदार सामंत म्हणाले, “आमदार म्हणून माझी जबाबदारी केवळ विकासकामे सुरू ठेवण्यापुरती मर्यादित नाही, तर प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवणे हेच माझे कर्तव्य आहे. गावोगावी जाऊन जनतेच्या समस्या ऐकून त्या मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
यावेळी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.