
दापोली तालुक्यात निवृत्त सैनिकाच्या घरातून दीड लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
दापोली तालुक्यातील वनौषी वानेवाडी येथील 83 वर्षीय सेवानिवृत्त सैनिक शिवराम बाबुराव पाटणे यांच्या घरातून अज्ञात चोरट्याने 1 लाख 40 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.पाटणे हे मूळचे वडोशी वानेवाडी येथील रहिवासी असून, ते भारतीय सैन्यातून निवृत्त झाले आहेत. त्यांच्या घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाटणे यांच्या घरातील उत्तर दिशेस असलेल्या गोद्रजेच्या कपाटातून चोरट्याने सोन्याचा लक्ष्मी हार, कानातील सोन्याच्या पट्ट्या आणि अर्धा तोळा वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 1 लाख 40 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे




