
शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करा
रत्नागिरी, दि. 17 ) :- सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 30 सप्टेंबर 2025 पर्यंत देण्यात आली आहे. सर्व विद्यार्थ्यांनी 30 सप्टेंबर 2025 पर्यंत hmas.mahait.org या वेबसाईटवर आपला ऑनलाईन अर्ज भरावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त दीपक घाटे यांनी केले आहे.
ऑनलाईन अर्ज स्वीकारल्यानंतर 4 ऑक्टोबर 2025 रोजी प्रत्येक वसतिगृहाच्या नोटीस बोर्डवर निवड झालेल्या विद्यार्थी/विद्यार्थिनींची नावे प्रसिद्ध करण्यात येतील. स्वाधार योजनेसाठी सुद्धा वरील वेबसाईट वर अर्ज भरावा.




