
राजापूर तालुक्यात पेंडखळे चिपटेवाडी फाटा परिसरात दुचाकीवर बिबट्याचा हल्ला, दुचाकी वरून पडल्यामुळे दुचाकी स्वार जखमी
रत्नागिरी जिल्ह्यात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक ठिकाणी पाळीव जनावर बिबट्यांकडून हल्ला होत असल्याच्या घटना घडत आहेत
राजापूर तालुक्यात पेंडखळे चिपटेवाडी फाटा परिसरात दुचाकीवर तीन बिबट्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे.
यामध्ये दुचाकीवरून पडून दुचाकीस्वार अनिल चिपटे गंभीररीत्या जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रूग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे हलविण्यात आले आहे. या घडलेल्या प्रकारामुळे आता ग्रामस्थांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. हल्ला करणार्या बिबट्याचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी पेंडखळे पंचक्रोशीतील गावांमधील ग्रामस्थांकडून केली जात आहे.




