मिस्त्री हायस्कूलचा तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत विजय

रत्नागिरी : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व फाटक हायस्कूल (रत्नागिरी) यांच्या संयुक्त विद्यमाने १६ सप्टेंबर रोजी आयोजित तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत शहरातील मिस्त्री हायस्कूलच्या १७ वर्षांखालील मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावले.
१७ वर्षांखालील मुलींच्या अंतिम सामन्यात मिस्त्री हायस्कूलने प्रतिस्पर्धी ए. डी. नाईक हायस्कूल (रत्नागिरी) संघाचा २.० ने पराभव केला. या सामन्यात फातिमा चरखे, मदीहा फनसोपकर, जेनब माखजनकर, नबा फणसोपकर, खदीजा वस्ता, अरफा खान, लाईबा धरमे, आदींना काझी, फरजाना मंसुरी, अहाना केळकर, सानिया पावसकर, सिदरा वाडकर या मुलींनी आपल्या दमदार खेळाने विरोधी संघाला पराभूत केले.
मिस्त्री हायस्कूलने क्रीडा क्षेत्रात यशस्वीरीत्या उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती मुनव्वर तांबोळी, पर्यवेक्षक मुश्ताक आगा, तालीमी इमदादिया संस्थेच्या वतीने संस्थाध्यक्ष अब्दुल हमीद मिस्त्री, संस्थेचे उपाध्यक्ष व शाळा समितीचे अध्यक्ष निसार लाला, सचिव तन्वीर मिस्त्री, सहसचिव शकील मजगावकर, खजिनदार जाहीर मिस्त्री, प्रमुख अधिकारी रफिक मुकादम, इकबाल मिस्त्री, कॅप्टन जावेद पटेल तसेच शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने यशस्वी खेळाडू व क्रीडा शिक्षक सैफान चरखे यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button