
दसरा-दिवाळीनिमित्त कोकण रेल्वेवर विशेष गाड्या धावणार
दसरा आणि दिवाळी सणानिमित्त वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने खास साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोकणमार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस – तिरुवनंतपुरम – लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर ०१४६३/०१४६४ साप्ताहिक विशेष गाडी सोडण्यात येणार आहे.
०१४६३ क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून २५ सप्टेंबर ते २७ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी दुपारी ४ वाजता सुटेल आणि तिरुवनंतपुरम येथे दुसऱ्या दिवशी रात्री १०.४५ वाजता पोहोचेल.
परतीची ०१४६४ क्रमांकाची गाडी तिरुवनंतपुरमहून २७ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी दुपारी ४.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी रात्री १ वाजता पोहोचेल. या गाडीला थिवी, करमळी आणि मडगाव येथे थांबा असेल.
तसेच, लोकमान्य टिळक टर्मिनस – सावंतवाडी (०११७९ क्रमांकाची गाडी) ही विशेष रेल्वे १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर शुक्रवारी सकाळी ८.२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९ वाजता सावंतवाडीत पोहोचेल.




