
घरात सर्प चावल्याने खेड येथील वृद्धाचा मृत्यू
खेड तालुक्यातील चाकाळे, जगदीश नगर येथे सर्पदंशामुळे एका 65 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बाळकृष्ण शंकर जाधव असे त्यांचे नाव असून, ही घटना 14 सप्टेंबर 2025 रोजी रात्री 11:50 च्या सुमारास घडली.बाळकृष्ण जाधव यांना घरात असतानाच साप चावला. उपचारासाठी त्यांना तात्काळ खेड येथील उपजिल्हा रुग्णालय कळंब बडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.




