
भूमापन कार्यालयात ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली लागूसुविधेचा लाभ घेण्याचे नागरिकांना आवाहन
रत्नागिरी, दि. 15 ):- भूमापन कार्यालयात चौथ्या व अंतिम टप्प्यात ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली 1 डिसेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे. राज्यातील 30 नगर भूमापन कार्यालयात तांत्रिक कारणास्तव अद्याप अंमलबजावणी करणे बाकी होते. आता सर्वच नगर भूमापन कार्यालयात 22 सप्टेंबर 2025 पासून ई-मोजणी व्हर्जन 2.0 आज्ञावली कार्यान्वित येत आहे. सर्व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी यांनी केले आहे.