
पक्षप्रवेशाच्या वावड्या, सडे जांभारी ग्रामस्थ ठाकरे शिवसेनेसोबत
गुहागर तालुक्यामध्ये पक्षप्रवेशाच्या वावड्या उठत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष अधिक बळकट करण्यासाठी तालुकाप्रमुख सचिन बाईत यांनी गाव भेट कार्यक्रम सुरू केला आहे. यावेळी सडे जांभारी ग्रामस्थांनी आपल्या बरोबर असल्याची ग्वाही दिली. तर या गावातील विविध विकासकामांवर सचिन बाईत यांनी यावेळी चर्चा केली.
गुहागर तालुक्यातील सडे जांभारी गावातील सत्य सेवा मंडळ ग्रुप क्र. ३ मातोश्री सभागृहाला सचिन बाईत यांनी भेट देऊन ग्रामस्थांसमवेत विविध विकासकामांबद्दल चर्चा केली. या गावातील छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्मारकाला अभिवादन करून नियोजित दौर्याला सुरुवात केली. सचिन बाईत यांनी २ वर्षापूर्वी याच स्मारकाच्या संरक्षण वॉलच्या कामासाठी आर्थिक सहाय्य केले होते. याबाबतच्या विकास कामांवर चर्चा करताना सदर कामे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सरपंच वनिता डिंगणकर, महेश माटल, सुरेश घेवडे, सुरेश दावडे, गंगाराम पागडे, तानाजी आग्रे, पांडुरंग वेलुंडे, सत्य सेवा मंडळ ग्रुप ३ चे अध्यक्ष शंकर दावडे, महादेव घेवडे, बबन दावडे, मंगेश दावडे, प्रकाश दावडे, जयवंत दावडे, शंकर वेलुंडे, केशव घेवडे, गणपत दावडे, संदीप दावडे, संतोष वेलुंडे, संतोष दावडे, प्रीती दावडे, शालिनी बारस्कर आदी महिला वर्ग तसेच बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.www.konkantoday.com




