
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति नाट्य स्पर्धा २ ऑक्टोबरपासून
नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृति उत्सवी नाटकांची स्पर्धा यंदा २ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मे २०२६ या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
ही सभा शहरातील हॉटेल विवेक येथे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मंत्री उदय सामंत यांनी शाखेत सभासद वाढवण्याच्या महत्वाची सूचना केली. या सभेला उपाध्यक्ष श्रीकांत भाटवडेकर, कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, कार्यवाह वामन कदम, खजिनदार सतीश दळी आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com