
दापोली तालुका क्रीडा संकुलातील व्यायामशाळा साहित्य तात्पुरत्या स्वरूपात वापरास देण्यासाठी 26 सप्टेंबरपर्यंत अर्ज करा
रत्नागिरी, दि. 15 ):- तालुका क्रीडा संकुल, दापोली येथील अंतर्गत व्यायामशाळा साहित्य दापोली तालुक्यातील शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / शासकीय कार्यालये / ग्राम पंचायती यांना खालील अटी व शर्तीच्या अधिन राहून निव्वळ तात्पूरत्या स्वरूपात विनामूल्य वापरास द्यावयाचे आहे. स्टॅम्प पेपरवर करार करुन द्यावा लागेल. अटी व शर्ती मान्य असणा-या दापोली तालुक्यातील इच्छुक शाळा / कनिष्ठ महाविद्यालये/ शासकीय कार्यालये /ग्रामपंचायती यांनी आपल्या अधिकृत मेल द्वारा ratnagiridso@gmail.com या ई मेलवर 26 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन तालुका क्रीडा अधिकारी एस. एस. धारूरकर यांनी केले आहे.
सदर व्यायामशाळा साहित्य ठेवण्यास किमान 500 चौ.फ़ू. बंदिस्त हॉल / व्यायामशाळा खोली स्वत: च्या मालकीची असने अनिवार्य आहे. व्यायामशाळा साहित्याची दुरूस्ती, निगा मागणी करणा-या शाळा / कनिष्ठ महाविद्यालये / शासकीय कार्यालये / ग्रामपंचायती यांना करावयाची आहे. व्यायामशाळा साहित्य तालुका क्रीडा संकुल,दापोली यांनी मागणी केल्यास ते विना विलंब तालुका क्रीडा संकुल,दापोली येथे सुस्थितीत पोच करावे लागेल. व्यायामशाळा साहित्य परस्पर इतर कोणालाही हस्तांतरीत करावयाचे नाही किंवा त्याचा व्यावसायिक वापर करावयाचा नाही. साहित्य गहाळ झाल्यास किंवा चोरीस गेल्यास किंवा मोडल्यास किंवा नादुरूस्त झाल्यास त्याची पूर्ण भरपाई करावी लागेल.