
कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण कडून सीआरझेड (CRZ) संदर्भात मंजुरी मिळाली
पर्यटन आणि मासेमारी व्यवसायाला चालना देण्यासाठी शासनाने कोकणातील चार महत्त्वाच्या ठिकाणी नव्या जेटी उभारण्यास महाराष्ट्र सागरी प्राधिकरण (एमसीझेडएमए)कडून सीआरझेड (CRZ) संदर्भात मंजुरी मिळाली आहे.त्यात रत्नागिरी जिल्ह्यातील देवाचेगोठणे येथील करंबेळकरवाडी (ता. राजापूर), उटंबर (ता. दापोली) आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर यांचा समावेश आहे. हे प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय प्राधिकरणाकडे पाठवण्यात आले आहेत.
कोकणच्या किनारपट्टीवर मासेमारी आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी जेटी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या जेटीमुळे मासेमारी नौका, प्रवासी बोटी आणि रो-रो जहाजे (वाहने घेऊन जाणारी जहाजे) यांना सुरक्षितपणे थांबता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांची तसेच मालाची वाहतूक अधिक सोईस्कर होणार आहे.