
९९व्या साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हावर पराक्रम अन् साहित्यशक्तीचा संगम
तलवारीच्या धारेवर अटकेपार झेंडा रोवणाऱ्या साताऱ्याच्या भूमीत आता लेखनीची धार तळपणार आहे. ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नुकतेच प्रकाशित झालेले बोधचिन्ह याच ऐतिहासिक प्रवासाचे प्रतीक बनले आहे.यात तलवारीची शौर्यगाथा आणि लेखणीची ज्ञानशक्ती यांचा सुंदर मिलाफ साधण्यात आला आहे.
साताऱ्यात तब्बल ३२ वर्षांनंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत असून, या संमेलनाची सध्या जोरकस तयारी सुरू आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या एका सोहळ्यात संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण प्रसिद्ध व्यंगचित्रकार, शि. द. फडणीस, बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्यासह मसाप, मावळा फाउंडेशनचे पदाधिकारी व साहित्यप्रेमींच्या उपस्थितीत करण्यात आले. हे बोधचिन्ह शि. द. फडणीस यांच्या कुंचल्यातून साकारण्यात आले




