रत्नागिरी शहरात कामगाराने दुकान मालकाला घातला साडेचार लाखांचा गंडा

विद्युत साहित्य वितरणाच्या व्यवसायातील कामगाराने वसूल केलेली रक्कम व काही विद्युत साहित्य दुकानदारांना न देता परस्पर लांबवून तब्बल 4 लाख 67 हजार 44 रुपयांची फसवणूक केली.फसवणुकीची ही घटना डिसेंबर 2024 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत शहरातील मारुती मंदिर रोडवरील के.एस.पी. अ‍ॅलेक्सा अपार्टमेंटमधील स्मित इलेक्ट्रिकल्समध्ये घडली.

परेश महादेव बापर्डेकर (वय 30, रा. कातळवाडी कोंड्ये लांजा, रत्नागिरी) असे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात दुकान मालक अमरेश सुरेश पावसकर (42, रा. शंखेश्वर मधुबन बोर्डिंग रोड माळनाका, रत्नागिरी) यांनी 13 सप्टेंबर रोजी तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित परेश बापर्डेकर हा फिर्यादी अमरेश पावसकर यांच्या स्मित इलेक्ट्रिकल्समध्ये विद्युत साहित्य वितरणाच्या व्यवसायात काम करीत होता.

डिसेंबर 2024 ते 1 ऑगस्ट 2025 या कालावधीत त्याने फिर्यादीच्या व्यवसायातील विद्युत साहित्य वितरित केलेल्या दुकानदारांकडून वसूल केलेली रक्कम तसेच काही विद्युत साहित्य संबंधित दुकानदारांना न पोहोचवता परस्पर लांबवत स्वतःच्या फायदासाठी वापरली. ती परत करण्यासाठी अमरेश सुरेश पावसकर यांनी त्याला मुदत देऊनही त्याने ती अद्याप परत केलेली नाही. या संदर्भात दुकान मालक पावसकर यांनी शनिवारी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button